शेअर मार्केटबद्दल संपूर्ण माहिती मराठीत || Share Market Full Information in Marathi

शेअर मार्केट म्हणजे काय?

             आपण शेअर मार्केटबद्दल सोशल मीडियावर किंवा आपल्या आजूबाजूला ऐकले असेलच तेव्हा मनात अनेक प्रश्न पडले असतील जसे की शेअर मार्केट म्हणजे काय? , ते कशे काम करते?, खरंच आपण शेअर मार्केट मधून पैसे कमवू शकतो का? अशा अनेक प्रश्नाच्या संबंधित माहिती पाहणार आहोत.



◆शेअर म्हणजे काय?

                मोठं मोठ्या कंपन्यांना त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी त्यांना पैशांची गरज असते, त्यासाठी ते त्यांच्या कंपनीचे शेअर चे छोटे छोटे भाग करून ते लोकांना विकले जातात. एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेणे म्हणजे त्या कंपनीचा एक छोटा मालकी हक्क विकत घेणे होय. 



◆शेअर मार्केट म्हणजे काय?

           शेअर मार्केट म्हणजे जेथे शेअर ची खरेदी विक्री होते. शेअरची स्टॉक एक्सचेंज च्या माध्यमातून खरेदी-विक्री होत असते. भारतात BSE आणि NSE हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत.

BSE - BOMBAY STOCK EXCHANGE

NSE - NATIONAL STOCK EXCHANGE


◆शेअर मार्केट काम कसे करते?

            सर्वात आधी एखादी कंपनी Stock Exchange मध्ये लिस्टिंग(सुचिबद्ध) करते त्यालाच IPO म्हणतात (IPO = Initial Public Offering) त्यामध्ये कंपनी आपल्या शेअरची किंमत ठरवते आणि पब्लिक साठी विक्री साठी ठेवते. त्यानंतर IPO पूर्ण झाल्यावर त्या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये येतात. त्याची Stock Exchange आणि ब्रोकर्सच्या माध्यमातून इन्व्हेस्टर्स द्वारा खरेदी विक्री होते.



◆NSE बद्दल माहिती

           NSE ची स्थापना 1992 साली झाली. त्याची इंडेक्ससूची NIFTY ही आहे. NSE मध्ये टोटल 1996 कंपन्या लिस्टेड आहेत. NSE ची मार्केट कॅप 1,38,04,607 करोड आहे. मार्केट कॅप सतत बदलत राहते.


◆BSE बद्दल माहिती

              BSE ची स्थापना 1875 साली झाली त्याची इंडेक्स सूची SENSEX ही आहे. BSE मध्ये 5000+ कंपन्या लिस्टेड आहेत. BSE ची मार्केट कॅप 1,44,85,885 करोड आहे आणि ती सतत बदलत असते.


आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की NIFTY आणि SENSEX म्हणजे काय? 

◆NIFTY

             NIFTY ही National Stock Exchange ची सूची(Index) आहे. NIFTY मध्ये TOP 50 कंपन्या लिस्टेड असतात. ज्या मार्केट कॅपिटलायजेशन च्या आधारावर आधारित असतात.


◆SENSEX

           SENSEX ही Bombay Stock Exchange ची सुची (Index) आहे आणि SENSEX मध्ये TOP 30 कंपन्या लिस्टेड असतात आणि त्या मार्केट कॅपिटलायजेशन च्या आधारावर आधारित असतात.




◆शेअरची किंमत कमी जास्त का होते?

           शेअर ची किंमत ही मागणी आणि पुरवठा यावर कमी आणि जास्त होत असते. शेअरची मागणी वाढली की शेअरची किंमत वाढते आणि शेअरची मागणी कमी झाली की शेअर ची किंमत कमी होते. अशा प्रकारे शेअरची किंमत कमी जास्त होत असते.



◆शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

           शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा शेअर ची खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंटची गरज असते.

डिमॅट अकाउंट कसे उघडायचे?

             डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुमचे वय 18 पेक्षा जास्त असायला हवे-

आवश्यक कागदपत्रे-

1)पॅन कार्ड

2)आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक हवा)

3)बँक पासबुक

4)फोटो

5)सही

जर तुमच्याकडे वरील सर्व गोष्टी असतील तर तुम्ही डिमॅट अकाउंट उघडू शकता

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी खाली क्लीक करा-

OPEN DEMAT ACCOUNT




◆शेअर मार्केट मधून तुम्ही कसे पैसे कमवू शकता?

1)गुंतवणूक(Investment)

          यामध्ये तुम्ही चांगल्या कंपनीचे शेअर 10 ते 20 वर्षासाठी खरेदी करून नंतर विकून चांगले पैसे कमवू शकता. चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला त्या कंपनीचे Fundamental Analysis करता आले पाहिजे. Fundamental Analysis कसे करायचे हे शिकण्यासाठी क्लिक करा.

Learn Fundamental Analysis


2)ट्रेडिंग (Trading)

               या मध्ये तुम्ही INTRADAY करून पैसे कमवू शकतात. इंट्राडे म्हणजे आज शेअर खरेदी करून आजच विक्री करावी लागते. Intraday मध्ये तुम्हाला Technical Analysis करता आले पाहिजे आणि त्याच बरोबर Target आणि Stop Loss लावता आला पाहिजे. हे सर्व कसे करायचे माहीत नसेल तर खाली क्लिक करा.


शेअर मार्केटबद्दल संपूर्ण माहिती देणारी PDF डाउनलोड करा.
Download File
मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri