शेअर मार्केटमध्ये Fundamental Analysis कसे करावे संपूर्ण माहिती मराठीत || Fundamental Analysis Full Information in Marathi

 Fundamental Analysis संपूर्ण माहिती मराठीत

             जर आपल्याला जास्त कालावधीसाठी एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्या शेअरचे Fundamental Analysis करावे लागते. Fundamental Analisis केल्यामुळे त्या कंपनीची संपूर्ण माहिती मिळते आणि आपण त्या माहितीच्या आधारे त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो. तर Fundamental Analysis कसे करायचे ते आता आपण पाहणार आहोत.



◆Fundamental Analysis कसे करायचे?

१) Company Analysis
२) Industry Analysis
३) Economy 
४) P-E Ratio
५) PEG Ratio
६) Balance Sheet
७) Profit and Loss Statement

       हे सर्व पॉईंट पहाणे यालाच Fundamental Analysis म्हणतात. Fundamental Analysis करण्यापूर्वी शेअर मार्केटबाबत माहिती असणे आवश्यक आहे. जर माहिती नसेल तर ती माहिती पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

Learn Share Market


१) Company Analysis

                Company Analysis मध्ये आपल्याला ती कंपनी काय करते हे पाहावे लागते तसेच त्याबरोबर ती कंपनी कशाप्रकारे चालते हेही पाहणे आवश्यक आहे. कंपनी अनालिसीस करताना कंपनीची मॅनेजमेंट टीम कशाप्रकारे काम करते हे पाहावे लागते.



२) Industry Analysis

          आपण जी कंपनी निवडली आहे ती कंपनी कोणत्या इंडस्ट्री मध्ये येते ते पहावे लागते. ती इंडस्ट्री भविष्यात कशा प्रकारे वाटचाल करेल याचाही विचार करावा लागतो. सध्या त्या इंडस्ट्रीला किती स्कोप आहे हेही बघावे लागते. अशाप्रकारे इंडस्ट्री अनालिसीस करावे.


३) Economy

            एखादया कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना देशाची Economy पाहणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. देशाच्या इकॉनॉमी वरून आपण त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायचा अंदाज लावू शकतो. देशाच्या इकॉनॉमी चा बऱ्याच कंपन्यांवर परिणाम होतो त्यामुळे गुंतवणूक करत असतांना देशाची इकॉनॉमी अभ्यासात घेणे हेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.




४) P-E Ratio

PE Ratio = Price Earning Ratio 

Formula = शेअर ची किंमत/EPS

             एखाद्या शेअर गुंतवणूक करण्यासाठी घेयचा असेल तेव्हा तो Overvalued आहे की तो Undervalued हे PE Ratio वरून Calculate करू शकतो. PE चा Ratio 10 ते 20 च्या दरम्यान असेल तर जास्त कालावधीच्या गुंतवणूकीसाठी चांगली मानली जाते. आणि Sector PE पेक्षा शेअरचा PE कमी असावा.


५) PEG Ratio

PEG = Price Earning Growth

Formula = PE/Annual EPS Growth

PEG > 1 = Company Overvalued

PEG < 1 = Company Undervalued

PEG = 1 = Best Value

अशाप्रकारे PEG Ratio अनालिसीस केले जाते.


६) Balance Sheet

Formula = Profit/No. Of Share

             कंपनीचे Balance Sheet पाहण्यासाठी तुम्हाला moneycontrol.com या वेबसाईटवर जावे लागेल. तुम्हाला या वेबसाईटवर कंपनीचे Balance Sheet पहायला मिळेल. Balance Sheet पाहताना त्यामध्ये कंपनीवर असलेले कर्ज, शेअर कॅपिटल, EPS हे सर्व पाहायला मिळेल




७) Profit and Loss Statement 

             तुम्ही tickertape.in या वेबसाईटवरून Profit and Loss Statement पाहू शकता. यामध्ये कंपनी झालेला नफा आणि तोटा पाहू शकता. कंपनी वर्षात किती नफा कामविते किंवा किती तोटा होतो ते पाहू शकता. व त्याआधारे आपण त्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची का नाही ते ठरवू शकतो.

             अशाप्रकारे वरील सर्व पॉईंट अभ्यासून आपण गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकतो. यालाच कंपनीचे Fundamental Analysis म्हणतात.

इंट्राडे करण्यासाठी महत्वाचे म्हणजे टेक्निकल अनालिसिस. तुम्हाला इंट्राडे आणि टेक्निकल अनालिसीस बद्दल माहिती हवी असेल तर खाली क्लिक करा


शेअर मार्केट फंडामेंटल अनालिसीसबद्दल संपूर्ण माहिती देणारी PDF डाउनलोड करा.
Download File
मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri