🚀 IT IS OSM हे अप्रतिम आहे!

१००% इ पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातूनच!

 


राज्यात खरीप हंगाम 2026 पासून शेतकऱ्यांची ई पाहणी करण्याची कटकट कायमची मिटणार आहे; राज्यात १००% इ पीक पाहणी सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2026 मध्ये 15 जुलै 2026 पासूनच केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्वे अप्लिकेशनच्या ( MH DCS ) माध्यमातून राज्यामध्ये किती पाहणी केली जाणार आहे, यावर्षी १००% ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची मदत घेतली जाणार असून 15 जुलै 2026 पासूनच सहायकाच्या माध्यमातून १००% E Peek Pahani  करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारकडून घेण्यात आलेले आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून हे प्रत्येक राज्यांना जमिनीचे  क्षेत्रफळ, पिकांची लागवड, पिकांची १००% आकडेवारीची माहिती देण्यासाठीच उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. प्रत्येक राज्यात या ००% माहिती देणे बंधनकारक करून या साठी केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातोय आणि याच अनुषंगाने याच उपलब्ध निधी मधून आता डिजिटल क्रॉप सर्वे अप्लिकेशनच्या ( ) माध्यमातून राज्यामध्ये ही dcs ई पीक पाहणी केली जाणार आहे. 

एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केली जात असताना अँड्रॉइड मोबाईल नसणे  नेटवर्क प्रॉब्लेम  किंवा आणखीन बऱ्याच साऱ्या बाबी मुदतीमध्ये ई पीक पाहणी न करणे किंवा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी बद्दल अवेअरनेस नसणे  याबरोबर चुकीच्या पद्धतीने पिकाच्या नोंदी लावून लावल्या जात होत्या याच्यामुळे पिकाचे आकडेवारी सुद्धा काही प्रमाणामध्ये चुकीची येत होती.

या सर्वांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना हा त्रास होऊ नये यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून संपूर्ण ई पीक पाहणी  सहायकाच्या माध्यमातून केले जाणार आहे. 


Gr पहा

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...