काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत 15000 पोलिस भरती करण्यास मंजूरी मिळाली आहे, लवकरच याची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
भरती प्रक्रिया हि ऑनलाईन अर्ज, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा याद्वारे घेतल्ली जाणार असून भरतीच्या सर्व पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. लवकरच या भरतीची जाहिरात येणार असून पोलिस भरती करणाऱ्यांसाठी हि खूप आनंदाची बातमी आहे.
या वर्षी सुरू होणाऱ्या 15000 पोलिस भरती च्या पार्श्वभूमीवर पोलिस भरतीचे निकष जाणून घेऊया,
पोलिस भरतीचे निकष -
वयोमार्यादा - वय साधारणता 18 ते 25 दरम्यान असावे (SC/ST - 5 आणि OBC - 3 वर्षांची सूट)
शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त बोर्डामधून 10 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता - पुरुष : ऊंची 163 cm आणि छाती 79 ते 84 cm
महिला : ऊंची 155 cm