जेव्हा 1972 मध्ये याच ज्ञानेश्वर माऊली च्या समाधीवर शंका उपस्थित केली गेली त्यावेळी काय झाल आणी कोणी शंका उपस्थित केली तेच आपण या लेखातून जाणून घेणार आहेत, तर नमस्कार प्रिय वाचकांनो तुमच OSM Naukri च्या ब्लॉगमध्ये तुमच स्वागत आहे,
सन 1972 भारताला नुकतेच स्वतंत्र मिळून काही वर्ष झाली होती. हा काळ होता भारत उभारणीचा आणि याच काळात अनेक सामाजिक चळवळी उभ्या राहत होत्या, विज्ञान आणि तंत्रज्ञानातही भारत प्रगती करत होता. आणि याच काळात काही सामाजिक चळवळ चालवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या लोकांना असे वाटू लागले की आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी हि अंधश्रद्धा आहे असे त्यांना वाटू लागले, आणि त्यांनी याची वैज्ञानिक दृष्ट्या तपासणी करण्याचे ठरविले. या लोकांमध्ये काही लोक ही पुण्यातील अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आणि काही विदेशी डॉक्टर होते. त्यांनी गरज पडल्यास आम्ही हि समाधी उघडून पाहणार असे त्यांनी सांगितले, आणि हि बातमी संपूर्ण आळंदी येथे पसरली आणि तेथील वातावरण ढवळून निघाले. काही भविकांमध्ये याचा प्रचंड राग निर्माण झाला होता तर काही भाविक देवाकडे भावनिक साद घालत होते.
हि संपूर्ण घटना बघता एक व्यक्ति समोर आली ती म्हणजे ह. भ. प. मामासाहेब झांडेकर. त्यांनी या लोकांना कडकडून विरोध केला त्यानंतर त्यांनी समाधीला हात न लावताच बाहेरून संशोधन करण्याच ठरविले.
नंतर दुसऱ्या दिवशी हि सर्व लोक आधुनिक तंत्रज्ञान घेऊन मंदिरात पोहचली त्यामध्ये गिगर मिलर काउंटर या उपकरणाने अल्फा, बिटा, ग्यामा रेज मोजता येतात. याने डोळ्याला न दिसणारे लहरी/ऊर्जा मोजता येतात. यामध्ये दुसरे उपकरण म्हणजे tharmister बोलोमिटर या उपकरणाने माणसाच्या डोळ्याना न दिसणाऱ्या अल्ट्रा व्हायलेट ऊर्जा मोजता येतात. तिसरे उपकरण म्हणजे फिकवेनसी रडार मिटर या उपकरणाने डोळ्यांना न दिसणारी ऊर्जा किंवा फिकवेनसी मोजता येते, आणि तीन उपकरणे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समधीपासून 6 फुट अंतरावर ठेवण्यात आले. नंतर तीन झाकण एक जस्तचे, दुसरे पितळाच, तिसरे होते लोखंडाच यातील एक एक झाकण समाधीवर टाकून मिटर वर काय दिसत आहे पाहू ते असे त्या लोकांच म्हणण होत. यानंतर जे झाल ते अविश्वसनीय होत मिटर 6 फुट अंतरावर ठेवल गेल होत, झाकण बदलली जात होती. पण प्रत्येक वेळेस तीच रीडिंग,ऊर्जा मिटरवर दिसत होती, हे पाहून त्या लोकाना विचार पडला कोणीही आत नाही तरीही तीच रीडिंग, ऊर्जा कसकाय येऊ शकते हे पाहून ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर ह. भ. प. मामासाहेब झांडेकर यांनी त्या लोकांना समजाऊन सांगितले हि समाधी काही मृत शरीर नाही हि एक चैतन्य आहे, ऊर्जा आहे ती डोळ्यांनी दिसत नाही पण त्याच अस्तित्व मिटरवर बघू शकता. यानंतर त्या लोकांचे डोळे उघडले गेले आणि त्यांनी समाधी न उघडण्याचा निर्णय घेतला.
आणि खऱ्या अर्थाने तेथे एक नवचैतन्य, ऊर्जा अस्तीत्वात आहे, जी डोळ्यांनी दिसत नाही परंतु तेथे गेल्यानंतर अनुभवायला मिळते.