MPSC Recruitment 2022
MPSC Bharti 2022 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक या पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना काढली आहे, त्यामुळे पदवी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी किंवा MPSC चा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या अधिसूचनेत एकूण 800 जागांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत, अर्ज हा ONLINE पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
संस्थेचे नाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोग
पदांची संख्या : 800 पदे
पदाचे नाव : सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आणि दुय्यम निबंधक
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाइट : www.mpsc.gov.in
शेवटची तारीख : 15 जुलै 2022
अर्ज फी : सर्वसाधारण - 394 /- रु आणि OBC/ST/SC/PH - 294/- रु
या भरतीची संपूर्ण माहिती :
▪ MPSC भरती 2022
पदांची माहिती :
पदांची माहिती
पदाचे नाव |
पदसंख्या |
सहाय्यक कक्ष अधिकारी |
42 |
राज्य कर निरीक्षक |
77 |
पोलिस उपनिरीक्षक |
603 |
दुय्यम निबंधक |
78 |
शैक्षणिक पात्रता :
▪ पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
वयोमार्यादा :
▪ 01 ऑक्टोबर 2022 रोजी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे वय पूर्ण असावे. (SC/ST - 05 आणि OBC - 03 वर्षांची सूट )
वेतनमान :
▪ 38600 रु ते 122800 रु पर्यन्त मासिक मानधन राहील.
निवड प्रक्रिया :
▪ पूर्व परीक्षा
▪ मुख्य परीक्षा
▪ शारीरिक चाचणी / मुलाखत
अर्ज कसा करावा 🖋️ ?
▪ खाली दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून (https://www.mpsc.gov.in/) आपण अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 ही आहे. या कालावधीत तुम्ही अर्ज करू शकता, पदवी उत्तीर्ण असणारे आणि वरील सर्व निकषामध्ये पात्र असलेले या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा :
▪ अर्ज सुरू होण्याची तारीख : 25 जून 2022
▪ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022