India Post GDS Result 2024
भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र डाक विभाग (Maharashtra GDS Result 2024) आणि बिहार डाक विभाग (Bihar GDS Result 2024) भरती 2024 चा निकाल आज जाहीर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यानी या भरतीसाठी अर्ज केला होता त्यांनी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइट (www.appost.in) वरुन किंवा खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता. भारतीय डाक विभागाकडून महाराष्ट्र डाक विभागामध्ये 2428 ग्रामीण डाक सेवकांची आणि 1940 बिहार डाक विभागात भरती निघाली होती, याची अर्ज प्रक्रिया ही 27 एप्रिल 2024 ते 14 जुलै 2024 पर्यन्त चालू होती.
असा पहा निकाल -
▪ सर्वात आधी appost.in या वेबसाइट वर जा.
▪ मुखपृष्ठावर गेल्यानंतर Results Released पहा.
▪ तिथे Bihar (1940) आणि Maharashtra (2428) असे पाहायला मिळेल यावर क्लिक करा.
▪ निकाल डाउनलोड करा आणि त्यामध्ये आपला रोल नंबर टाकून आपले नाव आहे का पहा.