आरोग्य विभाग भरती घोटाळा प्रकरण
आरोग्य विभागाची गट ड ची लेखी परीक्षा 31 जुलैला झाली होती मात्र त्या परीक्षेदरम्यान काही परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. यामध्ये पेपर फुटीचा प्रकरण समोर आल्याच दिसल तर अनेक पेपर देणाऱ्या उमेदवारांकडे पेपर होण्याच्या आधीच व्हाटसअप्प च्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आल्याचा समोर आले. त्यांनंतर पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
आता या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांच्या हाती दोन आरोपी लागले आहेत, त्यातील एक आरोपी हा 28 वर्षीय असून त्याला औरंगाबादेतून अटक करण्यात आली आहे. तसेच एका परीक्षार्थीकडे प्रश्नपत्रिका सापडली होती, हा पेपर त्याकडे कसकाय आला त्यानुसार पुणे सायबर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. ही कारवाई पुणे सायबर पोलिस सेल ने केली आहे.
आरोय विभाग गट क आणि आणि आरोग्य विभाग गट ड च्या परीक्षा घेणारी कंपनी ब्लॅकलिस्ट मध्ये असल्याची चर्चा चालू होती परंतु ही भरती परीक्षा राबवणारी न्यासा कंपनी ब्लॅकलिस्ट नाही असे स्पष्टीकरण राज्यमंत्री सतीश पाटील यांनी दिले आहे. ते माध्यमांशी बोलत असताना असेही म्हणाले की भरती परीक्षा पारदर्शक व्हावी, उमेदवारांना त्रास होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे.
पुणे जिल्ह्यातील 51% उमेदवारांनी परीक्षा दिली होती मात्र पुणे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर कोणताही गोंधळ झालेला नाही अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. पुणे जिल्ह्यात 132 केंद्रावर 60 हजार 317 उमेदवारांची परीक्षा व्यवस्था आरोग्य विभागाने केली होती त्यापैकी 51% उमेदवार परीक्षा देताना हजर होते अशी माहीती आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे सहाय्यक संचालक डॉ. संजय देशमुख यांनी दिली. तर आरोग्य विभागाच्या पेपर फूटी प्रकरणी पुणे सायबर सेलचा वेगाने तपास चालू आहे.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.