चालू घडामोडी
दिनांक - 03 डिसेंबर 2021
1. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोंनाचा नवीन व्हेरीएंट ओमिक्रॉन 30 देशात पोहचला आहे. तसेच भारतात 2 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा व्हेरीएंट चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले आहे. थकवा आणि शरीरात वेदना होणे ही ओमिक्रॉन चे प्रमुख लक्षणे आहेत व त्यासोबतच काही रूग्णात डोकेदुखी होते.
2. आजपासून 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. हे साहित्य संमेलन नाशिक येथे भरवण्यात आले आहे. तसेच ही संमेलन पुढील तीन दिवस चालेल.
3. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात डायनासोरचे जीवाश्म आढळलेले आहेत. यामध्ये 4 फूट लांब आणि 1 फूट रुंद पायाचे हाड, तीन फूट लांब बरगडीचे हाड आढळलेले आहे. भूशास्त्रज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी संशोधन केले आहे.
4. आज भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची 137 वी जयंती आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी बिहारमधील सारण जिल्ह्यातील जिरादेई गावात झाला. 26 जानेवारी 1950 ते 14 मे 1962 या कालावधीत त्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार पाहिला. निवृतीनंतर त्यांना देशाचा सर्वोच नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला.
4. आज जागतिक अपंग दिवस. दरवर्षी 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिवस म्हणून पाळला जातो.
5. रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मोठे विधान केले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास आम्ही शांत बसणार नाही, असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.
6. भारतीय हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासात जवाद चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.